धुळे : शेतकऱ्यांना आधुनिक पद्दतीने भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण

भाजीपाला लागवड प्रशिक्षण,www.pudhari.news

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; लुपिन ह्यूमन वेलफेअर रिसर्च फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील आठ गावात एकात्मिक शाश्वत विकासाच मोठं काम हाती घेतले आहे. यासाठी 250 गरीब व गरजू कुटूंबांची निवड करुन त्यांची आर्थिक उन्नती करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

गरीब व गरजू लाभार्थ्यांची निवड करुन सिंचन सुविधा, कुकूटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय भाजीपाला लागवड, स्व्यंयंम रोजगार उपक्रमांसाठी संस्था लाभार्थ्यांना मदत करीत आहे. आधुनिक भाजीपाला लागवड तंत्र व नव नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत होणारे बदल, जैविक शेती, गांडूळ खत व जैविक औषधांचे महत्व या विषयावर संस्थेच्या जेबापूर कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षण कार्यशाळे प्रसंगी संस्थेचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे प्रकल्प व्यवस्थापक निलेश पवार, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील, तालुका समन्वयक उमाकांत पाटील, विभाग समन्वयक उमाकांत साळुंके, मनोज एखंडे, राकेश खैरणार, निलेश देसाई उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित 45 लाभार्थ्यांना, गांडूळखत निर्मितीचे बेड, जैविक औषधे आणि जैविक खते तसेच ते तयार करण्यासाठी 200 लिटर पाण्याची टाकी आणि भाजीपाला बियाणे वितरीत करण्यात आले.

The post धुळे : शेतकऱ्यांना आधुनिक पद्दतीने भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण appeared first on पुढारी.