धुळे : शेवाळी फाट्यावर कार व बसचा भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

अपघात

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील शेवाळी फाट्यावर कार व लक्झरी बसचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे व लक्झरीचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताबाबत अद्यापही साक्री पोलिसांत नोंद करण्यात आलेली नाही, मात्र दोन्ही वाहने साक्री पोलीस स्टेशनच्या आवारात नेण्यात आली आहे.

साक्री जवळील शेवाळी फाट्यावर रात्री वसमारहुन चेतन देविदास नेर हा तरुण आपल्या मित्रांसोबत कार क्रमांक जी जे 06 पीएच 6794 येत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरी क्रमांक एआर 01टी 3232 या लक्झरीने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने यात चेतन नेरे या तरुणाचा मृत्यू झाला व विकास बच्छाव आणि दीपक वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी दोघांना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मयत चेतन नेरे हा तरुण पुण्यात मेक्निकल इंजिनिअर होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व दोन वर्षाचा मुलगा आहे. घरातून गोड बोलून निघालेल्या तरुणाची काही वेळेतच वाईट बातमी धडकल्याने वसमार गावात शोककळा पसरली आहे. घरातील कर्ता तरुण मुलगा गेल्याने आई-वडील व पत्नी यांच्यावर दुख्खाचा डोंगर कोसळला आहे.

The post धुळे : शेवाळी फाट्यावर कार व बसचा भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी appeared first on पुढारी.