धुळे : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवलं, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

ग्रामपंचायत सदस्यत्व रद्दा,www.pudhari.news

धुळे (पिंपळनेर)पुढारी वृत्तसेवा

शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश सुभाष बधान यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. योगेश बधान यांची आई (मयत) व वडिल सुभाष शिवराम बधान यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय साहेबराव गांगुर्डे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

शासकीय जमिनीवर दुकान असून ते बधान यांच्या आई-वडिलांचे आहे. तसेच योगेश बधान हे एकत्रित कुटुंबाचे घटक असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र आपण अतिक्रमण केलेले नसून विभक्त राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आहे, असा बचाव योगेश बधान यांनी केला होता. मात्र हा बचाव ग्राह्य धरण्यात आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी योगेश बधान यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

हेही वाचा :

The post धुळे : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवलं, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द appeared first on पुढारी.