धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी

पांझराकान साखर कारखान्यात चोरी

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील भाडणे येथील बंदावस्थेत असलेल्या पांझराकान सहकारी साखर कारखान्याच्या गोडाउनमधून मागील तीन ते चार महिन्यांपासून तब्बल 14 इलेक्ट्रिक मोटारींसह इतर साहित्य चोरीला गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिक रहिवासी आणि कामगारपुत्र तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय अहिरराव यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा ठेकेदारांच्या संगनमताने दररोज रात्री काहीना काही चोरीस जाण्याचा प्रकार घडत होता. यापूर्वीदेखील असे प्रकार घडले असून ,त्यावेळेसदेखील पोलिस तक्रार नोंदवविली होती, पण काही निष्पन्न झाले नाही.

दोन दिवसांपूर्वी भाडणे येथील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार गोडाउनची प्रत्यक्ष पाहणी केली असता लेखापरीक्षणानुसार मोटारींची संख्या 40 असताना तेथे प्रत्यक्ष फक्त 26 मोटारी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच डिस्टिलरी प्लांटच्या साहित्याची पाहणी केली असता सुमारे 30 ते 40 टक्के साहित्यदेखील गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी होऊन सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची ही बाबदेखील प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी अपेक्षा चौकशी करणारे आणि स्थानिक व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : 

The post धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी appeared first on पुढारी.