
धुळे : पुढारी वृत्तसेवा
शहरानजीकच्या टोलवसुली केंद्राचा ठेका मिळण्यासाठी सात लाखाची लाच घेताना इरकॉन सोमा टोलवे कंपनीच्या अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात इरकॉन सोमा टोलवे कंपनीचे वित्त अधिकारी हरीश सत्तेवली यांनी कंपनीचे संचालक प्रदीप कटियार यांच्या सांगण्यावरून सात लाख रुपयाची रोकड स्वीकारली. सत्यवली यांना अटक केली असून कटियार यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
धुळे येथील रहिवासी असणाऱ्या तक्रारदाराने इरकोन सोमा टोलवे अंतर्गत असणारा चांदवड येथील टोलवसुली केंद्राची देखभाल आणि दुरुस्तीचे काम डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान केले होते. या कामाच्या मोबदल्याचे बिल प्रलंबित होते. त्याचप्रमाणे या तक्रारदाराने धुळे नजीकच्या अवधान शिवारातील टोलवसुली केंद्राच्या ठेक्यासाठी निविदा भरली होती. टोलवसुलीचे काम मिळण्यासाठी त्यांनी सत्यवली यांच्याशी संपर्क साधला होता. सत्यवली यांनी संचालक प्रदीप कटियार यांच्याशी संपर्क साधून नंतर तक्रारदाराकडे सात लाखांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने धुळे येथील कार्यालयात उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तक्रारदाराला पुन्हा धुळे टोलवसुली केंद्रात पाठविल्यानंतर सज्यवली यांनी पुन्हा भ्रमणध्वनीवरून संचालक प्रदीप कटियार यांच्याशी संपर्क साधला होता. कटियार यांच्यासाठी पाच लाख आणि स्वतःसाठी दोन लाख अशी सात लाखांची पुन्हा मागणी केली हाेती. त्यानुसार धुळ्याच्या टोलवसुली केंद्रात पोलिस पथकाने सापळा रचत सत्यवली यांना सात लाखांची रोकड घेताना रंगेहाथ पकडले. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
हेही वाचा :
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना मोठा धक्का; भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास केंद्राची मंजूरी
- पिंपरी : मविआला 440 व्होल्टचा करंट द्या : बावनकुळे
- मंत्र्यांना कोल्हापूरची वस्तुस्थिती कळाली असती तर काय बिघडले असते?
The post धुळे : सात लाखाची लाच घेताना इरकॉनचा अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.