धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज आंदोलन केले. स्वातंत्र्यवीरांचा हा पुतळा महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर देखील शरसंधान केले आहे.

धुळ्यातील पांझरा नदीच्या काठावर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आज शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महानगरपालिकेमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर टीका केली आहे.

धुळे शहरातील  स्वातंत्र्यवीरांचे हे स्मारक 80 च्या दशकात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य सभा धुळे यांच्या माध्यमातून उभारण्यात आले.  हे स्मारक अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरले असून या स्मारकाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. हे स्मारक आता राज्य परिवहन मंङ॓ळ म्हणजे एस.टी चा नंदुरबार शहादा, शिरपूर, मध्यप्रदेश या ठिकाणी जाण्या करीताचा थांबा झालेले असून या स्मारकाचे कठङे, मुख्य स्मारकाचा चबुतरा यांचे बांधकाम व त्यावर लावलेली संगमरवरी फरशी पुर्णतः. उखङुन गेलेली आहे. स्मारकाच्या अवती भोवती छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण झालेले असून या स्मारकाला लागूनच जुने संभाजी गार्डन असून त्याचीही दुरावस्था झालेली आहे.

धुळे शहराचे विद्यमान महापौर प्रतिभा चौधरी व उपमहापौर नागसेन बोरसे यांच्या प्रभागात हे स्मारक येते. तरीही या स्मारकाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून येत्या 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 141 वी जयंती असून त्या पार्श्वभूमीवर या स्मारकाचे लवकरात लवकर दुरूस्ती व नव्याने आराखङा तयार करून भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने स्मारक परिसरात मनपा प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात येवून आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, ङाॅ. सुशील महाजन, गुलाब माळी, विनोद जगताप, संजय जवराज, प्रविण साळवे, कैलास मराठे, आण्णा फुलपगारे, मच्छिंद्र निकम, प्रकाश शिंदे, छोटुभाऊ माळी, सागर निकम, पिनुभाऊ सुर्यवंशी, निलेश कांजरेकर, शत्रुघ्न तावङे, शुभम मतकर, मनोज शिंदे, अमोल ठाकूर, सागर भङागे, अनिल शिरसाठ, प्यारेलाल मोरे, नितीन जङे, लक्ष्मण बोरसे, दिनेश ठाकूर, हेमंत देशमुख, नाना चंदात्रे आदिंसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन appeared first on पुढारी.