Site icon

धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिले आहेत.

धुळ्यात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये जमावातील एका गटाने आक्षेपार्ह घोषणा दिल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार आज भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे, नगरसेवक हिरामण गवळी, तसेच हर्षल विभांडिक, प्रभा परदेशी यांच्यासह सनातन संस्था आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरु शिष्य स्मारकापासून मूक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

यानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, तसेच डीएसबी चे आनंद कोकरे हे उपस्थित होते.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये देण्यात आलेल्या घोषणा संदर्भातील तक्रार प्रशासनाला दिली. या घोषणेमध्ये जीवे ठार करण्याच्या उद्देशाने संबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आला. या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्तरावर या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वादग्रस्त क्लिप पाहून यात सत्यता तपासून कारवाई केली जाईल, असे आश्वासन देखील देण्यात आले. त्याचप्रमाणे शोभा यात्रेमध्ये अशा प्रकारच्या आक्षपार्ह घोषणा दिल्याची नोंद पोलीस ठाणे स्तरावर घेतली जावी. यातून पुढील वर्षी शोभायात्रेची परवानगी मागण्यासाठी आलेल्या आयोजकांना या प्रकरणी जमावावर नियंत्रण ठेवण्याची सूचना देणे शक्य होईल असे देखील पाटील यांनी सुचवले.

हेही वाचा :

The post धु्ळे : शोभायात्रेत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी appeared first on पुढारी.

Exit mobile version