नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

नंदुरबार

नंदुरबार; पुढारी वृत्तससेवा :   शहरातील द्वारकाधिश नगरात चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील द्वारकाधिश नगरात रहिमोद्दीन अल्लउद्दीन मन्यार यांचे घर आहे. सदर घराचा कडीकोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड व १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत रहिमोद्दीन मन्यार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.

हेही वाचा;

The post नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.