
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यापासून नवापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडेच शिल्लक नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत होती. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांद्वारे याबाबत माहिती मिळताच नंदुरबारच्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी यावर उपाययोजना करत स्मशानभूमी येथे लाकडे सुपूर्द केली.
पोलिस अधीक्षकांसह नवापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून सुमारे चार टन लाकडे उपलब्ध करून दिली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी खोळंबलेल्या मृतदेहांना अग्निडाग मिळाला. नवापूर परिसरात लाकडेच उपलब्ध नसल्याने गुजरात राज्यातून पोलिसांनी चार टन लाकडे उपलब्ध करून दिली आहेत. खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन झाल्याने नवापूर परिसरातील मृताच्या नातेवाइकांनी साश्रूनयनांनी पोलिसांना धन्यवाद दिले. मात्र, पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे या पोलिस समूहाने हे आपले कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा:
- वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स वेलनेस एज्युकेशन उपक्रमास नंदुरबार येथून प्रारंभ : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
- Pathaan: ‘त्यांना’ अभिनेत्रींचे कपडे बघण्यासाठी वेळ मिळतो, नेत्यांवर स्वरा भास्करचा निशाणा
- नंदुरबार : बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावे- डॉ. विजयकुमार गावित
The post नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली appeared first on पुढारी.