
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संघटनात्मक दौऱ्याचे राज्यस्तरीय सहप्रमुख’ पदाची आणखी एक नवी जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांना सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसह भाजपा-प्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
विजय चौधरी हे विद्यमान स्थितीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याबरोबरच त्यांना भाजपातील राष्ट्रीय नेता दौऱ्याचे सहप्रमुखपद सोपविण्यात आले आहे. ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी केलेली संघटनात्मक कामगिरी तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून केलेले संघटनात्मक कार्य लक्षात घेऊन पक्षाने त्यांना ही जबाबदारी सोपविली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः ही नवी जबाबदारी चौधरी यांना सोपवित नियुक्तीपत्र प्रदान केले.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र “प्रदेश अध्यक्ष संघटनात्मक दौरा सहप्रमुख” पदी आपली नियुक्ती करीत आहे.आपण अनेक वर्षे पक्षाच्या विविध जबाबदा-या घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आपण गत काळातील महाराष्ट्रभर केलेल्या संघटनात्मक प्रवासाचा अनुभव ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे., असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा:
- तुरुंगाची हवा खात अन् पाण्याचे घोट घेत KRK चे 10 किलो वजन घटले!
- Gold prices Today : सोने- चांदी दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळा दर
- फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाला अर्थ नाही, हे तर रडणाऱ्याला मोठ्या फुग्याचं आमिष दाखवण्यासारखं : शरद पवारांची टीका
The post नंदुरबार : भाजपाचे विजय चौधरी यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौरा सहप्रमुख पदाचीही जबाबदारी appeared first on पुढारी.