नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

चंद्रकांत बावनकुळे www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे दि. 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची तसेच त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी दिली.

अधिक माहिती देताना विजय भाऊ चौधरी यांनी सांगितले की, नंदनगरीत प्रथमच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले असून त्यात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि महत्त्वपूर्ण चर्चा होईल. त्याचबरोबर सामाजिक संवाद, बुथ कार्यकर्त्यांशी संवाद, युवा शाखेचे उद्घाटन तसेच कार्यकर्त्यांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांचा त्यात समावेश राहील. त्याप्रसंगी बाईक रॅली काढून नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. तसेच त्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज (दि. 30) दुपारी चार वाजता विजयपर्व येथे आयोजित करण्यात आली आहे . राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा:

The post नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर appeared first on पुढारी.