Site icon

नंदुरबार : महिला पोलिसांच्या मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

नंदुरबार : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅली आयोजित केली होती. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर जनमानसात बाल विवाह विरोधी जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता.

मोटार सायकल रॅलीत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार हेल्मेटसह सहभागी झाले होते.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व अमंलदार यांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली व तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रैलीचा उत्साह वाढविला.

हेही वाचा :

The post नंदुरबार : महिला पोलिसांच्या मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Exit mobile version