Site icon

नंदुरबार : संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते तळोद्यात लाभार्थ्यांना गॅस किट वाटप

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

देशातल्या माता भगिनींचे आयुष्य सुकर झाले तरच देश समृद्ध होईल. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उज्ज्वला 2.0 या योजने अंतर्गत देशभरात सुमारे 1 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने हाती घेतले आहे. ते पूर्ण करण्याचा भाग म्हणून संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते तळोद्यात 800 गॅस कनेक्शन आणि शेगडीचे वितरण करण्यात आले आहे. सरकारतर्फे सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अशा अनेक योजना राबवल्या जात असून आपण सर्वांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी केले.

तळोदा येथे काल 3 मार्च 2023 रोजी सायंकाळी किरण गॅस एजन्सी तळोदा आणि लीना गॅस वितरक बोरद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गॅस वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते याप्रसंगी 800 लाभार्थ्यांना उज्वला गॅस किट वाटप करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “गॅसची सुविधा मिळाल्यानंतर गरीब महिलांचे कष्ट आपल्या एखाद्या कृतीतून कमी होणार असतील तर ही फार समाधान देणारी गोष्ट आहे. गरजूंपर्यंत सरकारच्या योजना 100 टक्के पोहोचल्या तरच सामाजिक दरी लवकरच नष्ट होईल असे मला वाटते. आज आम्ही जवळजवळ 800 गॅसचे वाटप केले. लवकरच संपूर्ण देशभर 1 कोटी गॅस वितरीत केले जातील आणि माझ्या करोडो माता भगिनी श्वसन, डोळे, डोके, फुफ्फुसांच्या आजारांच्या विळख्यातून मुक्त होतील ही फार आनंदाची बाब आहे” त्यांच्या या औदार्याबाबत ग्रामस्थांनी देखील मनपूर्वक आभार मानत योजनेचे स्वागत केले. यावेळी लाभार्थी महिलांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.

नंदुरबार येथील जनकल्याणाकरीता गॅस कनेक्शनसाठी मिळणाऱ्या किटचा लाभ मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. (छाया: योगेंद्र जोशी)

हेही वाचा:

The post नंदुरबार : संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते तळोद्यात लाभार्थ्यांना गॅस किट वाटप appeared first on पुढारी.

Exit mobile version