नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा केवळ पोटात दुखण्याने मृत्यू की आणखी काही? कारण अनभिज्ञ; संशय कायम 

सिडको (नाशिक) : पोलिस व मनपा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी या प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्याने सध्या मृत्यू स्वस्त झाला की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा फक्त पोटात दुखल्याने मृत्यू होणे, हे कारण संशयास्पद असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काय घडले नेमके?

घटनेबद्दल कमालीचे आश्चर्य

गुडिया अमरनाथ राजभर (३३, मूळ रा. लिंग चौकीपूर, ता. बकालिया, जि. गालिपूर, रा. उत्तर प्रदेश, हल्ली रा. मोरे मळा, उत्तमनगर, सिडको) यांना राहत्या घरी शुक्रवारी (ता. १९) दुपारीला अचानक पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना श्री स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी येथे दाखल केले. येथील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले असता तेथे डॉ. तडवी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी तपासी अंमलदार पवन परदेशी यांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी मी सुटीवर असल्याने या संदर्भात काही माहिती नसून माहिती घेऊन आपणाशी संपर्क साधतो, असे सांगितले. तर मोरवाडी येथील महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. छाया साळुंखे यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनीदेखील या घटनेची कल्पना नसल्याचे सांगितले. ज्या मातेने आपल्या पोटातील गर्भाची वाढ करण्यासाठी नऊ महिने लावले व पोटात दुखू लागल्याने वेळेवर रुग्णालयात जाऊनही तिचा जीव वाचला नाही, शिवाय तिच्या मृत्यूचे कारण नेमके काय, याचा साधा थांगपत्ताही संबंधित विभागाला नसावा, याबद्दल कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांनी संबंधित निद्रिस्त विभागाबद्दल संताप तर गर्भवती महिलेच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली आहे.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

पोलिस व वैद्यकीय अधिकारी अनभिज्ञ; परिसरात हळहळ व्यक्त

नऊ महिन्याच्या परप्रांतीय गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी येथे दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले असता, तेथे तपासून मृत घोषित केले. या महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस ठाण्यात केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करून सोपस्कार पार पाडण्यात आले. मृत्यूप्रकरणी अंबड पोलिस व मनपा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्याने सध्या मृत्यू स्वस्त झाला की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा फक्त पोटात दुखल्याने मृत्यू होणे, हे कारण संशयास्पद असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!