नऊ वर्षांपासून राज ठाकरेंच्या भेटीची आस! इच्छा अखेर लवकरच होणार पूर्ण

सिडको (नाशिक) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीची नऊ वर्षांपासून आस लागलेल्या तरुण चित्रकाराची इच्छा अखेर मनसे नाशिक जिल्हाध्यक्षांच्या मदतीने पूर्ण होणार आहे. संबंधित चित्रकार व मित्रपरिवारातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

राज ठाकरे यांना भेटीची ‘त्यांची’ आस लवकरच पूर्ण 
राजकारणाबरोबर आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी व्यंग्यचित्राच्या माध्यमातून अनेकांना घायाळ करणाऱ्यांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या विविध शैलीतील पैलूंची ठेव आपल्या चित्ररूपी पुस्तकातून साकारण्याचे काम नाशिकमधील सिडकोतील एक अवलिया रंगछटाकार विनोद सोनवणे या तरुण चित्रकाराने केली आहे. त्यांना राज ठाकरे यांच्या भेटीची आस लागली होती. त्यांची राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा पूर्ण होणार असून, लवकरच ते आपले चित्ररूपी पुस्तक त्यांना सप्रेम भेट देणार आहेत.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

समाधानाचे वातावरण व्यक्त

या संदर्भात ‘सकाळ’ने दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी सोनवणे यांची राज ठाकरे यांची भेट घालून देणार असल्याचे कळविले आहे. सोनवणे यांच्या परिवारात समाधानाचे वातावरण व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

‘सकाळ’ची बातमी वाचली. या बातमीची दखल घेऊन लवकरच राजसाहेब ठाकरे व चित्रकार विनोद सोनवणे यांची भेट घालून देणार आहोत. ‘सकाळ’च्या या उपक्रमाचे मी स्वागत करतो. -दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष, मनसे, नाशिक 

मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर माझी भेट राजसाहेब ठाकरे यांच्याशी घालून देणार असल्याने मला व माझ्या कुटुंबीयांना अत्यानंद झाला आहे. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने ‘सकाळ’चा आभारी आहे. -विनोद सोनवणे, चित्रकार, सिडको, नाशिक