नगरपरिषदेची घोषणा अन् ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची नोटीस एकाचवेळी; ओझरच्या नागरिकांमध्ये संभ्रमावस्था

ओझर (जि.नाशिक) : मागील आठवडयातच ओझर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत होणार असा आदेश आल्याने लहान कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्याच कोपरा बैठका रंगल्या. तसे जोरात वारे वाहून जो तो आपआपल्या परिने मोर्चेबांधणी करत असतांनाच शासनाचे प्राधिकृत निवडणुक अधिकारी तथा निफाडचे तहसिलदार शरद घोरपडे यांनी ओझर ग्रामपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेण्याची व निवडणुक अधिकारी म्हणून प्रशांत ए तांबे यांची नियुक्ती केल्याची नोटीस पाठवण्यात आली असल्याने नगरपरिषद की ग्रामपंचायत अशी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे 

एकीकडे नगरपरिषदेची घोषणा, दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची नोटीस 
निवडणुक आयोगाने ( तहसिलदार ) यांनी पाठवलेल्या नोटीस नुसार ग्रामपालीकेचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे त्यानुसार ग्रामपंचायतीच्या एक ते सहा वॉर्ड मधील निवडणुक लढविण्यास ईच्छुकांनी २३ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २० या कालावधीत ( २५, २६, २७ या सार्वजनिक सुट्टया वगळून ) सकाळी ११ ते ३ या वेळेत लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार निफाड ( हॉल ) या ठिकाणाहून नामनिर्देशन पत्र घेऊन भरून निवडणुक अधिकारी यांचेकडे निर्देशित केलेल्या ठिकाणी सादर करण्यात याव्या.३० डिसेंबर रोजी निवडणुक लठ्वणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक ३१ डिसेंबर २० रोजी अकरा वाजता आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी ३ वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेता येईल व याच दिवशी निवडणुक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २१ रोजी सकाळी साडेसात ते साडेपांच या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

नागरिकांमध्ये संभ्रमावस्था
मागील आठवडयात नगर परिषदेचा आदेश गाजला त्याचा धुरळा बसतो न बसतो तोच शासनाने ओझरच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रोग्रॅम जाहिर केला. असाच धुरळा बारा वर्षापूर्वी पिंपळगाव बसवंत येथे नग परिषद होणार असाच उठला होता मात्र एक तप उलटले तरी नगर परिषद झालीच नाही मग ओझरच्या बाबतीत आताशी कुठे आदेश निघाला मुहर्त कधी लागणार की पिंपळगांव बसवंत सारखेच नगर परिषदेचे घोंगडे अडकुन राहणार ?

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ