नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; येथील कमोदकर, कटके-कापसे वस्तीलगत व राजकुमार शुक्ला यांच्या वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकून मारहाणीसह लूट करणाऱ्या नऊ संशयित आरोपींना येवला पोलिसांनी 48 तासांत जेरबंद केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी सोमवार (दि. ३०) पर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
लखन जनार्दन पवार (वय १९), राजू ऊर्फ राजेंद्र दत्तू माळी (२०), ज्ञानेश्वर त्र्यंबक मोरे (३०), त्र्यंबक केशव मोरे (६०), गणेश वसंत माळी (२२), शरद सुभाष माळी (३८, सर्व रा. मुळूबाई घाट, नगरसूल), संजू दादू पवार (३६, रा. मशिदीजवळ नगरसूल), सोनू नानासाहेब गांगुर्डे (३३ रा. नंदीनगर, धामोरी, ता. कोपरगाव), नामदेव नाथा गायकवाड (३५, रा. पांजरवाडी, ता. येवला) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी कमोदकर आणि शुक्ला कुटुंबीयांना जबर मारहाण करून रोकड आणि दागिने लंपास केले आहेत. आरोपींची एक दुचाकी व फिर्यादी व साक्षीदारांचे दोन मोबाइल पोलिसांच्या ताब्यात आहेत.
घटनेचा अधिक तपास येवला तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सहायक निरीक्षक भास्कर शिंदे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, प्रल्हाद पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक अढांगळे, पोलिस हवालदार इरफान शहा, पोलिस नाईक राजेंद्र बिन्नर, राजेंद्र केदारे, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्हाळ, दिनकर पारधी, दत्तात्रय कोळपे, किरण पवार, पोलिस काॅन्स्टेबल नंदकिशोर पिंपळे, आबा पिसाळ, गौतम मोरे, गणेश बागूल, मुकेश निकम, सचिन बनकर, गणेश सोनवणे,पंकज शिंदे, रामेश्वरी रणधीर यांनी फिर्यादी व साक्षीदार यांनी दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचा शोध घेत अटक केली. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दरोड्याची पाहणी करत जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र फिरवित तपास पथकाद्वारे संशयितांना ताब्यात घेतले.
हेही वाचा :
- Bigg Boss 17 : हिरो बनायला चालला होता हा’ स्पर्धक, बिग बॉसने आरसा दाखवताच अश्रू अनावर
- JEE Exam : जेईई परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
- Asian Para Games 2023 | बॅडमिंटनमध्ये भारतीयांचा दबदबा, तुलसीमथी मुरुगेसनने जिंकले सुवर्ण
The post नगरसूल दरोड्यातील नऊ संशयित आरोपी जेरबंद appeared first on पुढारी.