मालेगाव (जि.नाशिक) : महापालिकेचे कॅम्प भागातील नगरसेवक संजय काळे (वय ५३, रा. पठाडे गल्ली) यांनी त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. हा जल्लोषच त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला.
नगरसेवकाला वाढदिवसानिमित्त गुन्ह्याची मेजवाणी!
वाढदिवस कार्यक्रमाची कोणतीही परवानगी त्यांनी घेतली नाही. विनामास्क तसेच डीजे वाजवून गर्दी जमा करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कॅम्पातील पठाडे गल्लीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर पोलिस शिपाई नंदू चव्हाण यांनी याबाबत तक्रार दिली.काळे यांनी वाढदिवस कार्यक्रमाची परवानगी घेतली नाही.
हेही वाचा - नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.
विनापरवाना सवाद्य सोहळा साजरा केल्याने कारवाई
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन न करता विनामास्क तसेच डीजे वाजवून गर्दी जमा केली. सार्वजनिक रस्ता अडवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून हा गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह