नगरसेवक म्हणतायत, “टायगर अभी जिंदा है, नाशिकमध्ये महाजनांचाच शब्द महत्वाचा”

नाशिक : स्थायी समिती मध्ये सत्ता येईल कि नाही अशी स्थिती असताना पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनसेला सोबत घेत सत्ता राखली. त्या शिवाय सदस्यांची नियुक्ती करताना अडचण होणार नाही याची काळजी घेत नाशिक मध्ये महाजन यांचाच शब्द महत्वाचा असल्याचे दाखवून दिल्याने सदस्यांमधून टायगर अभी जिंदा है अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. 

महाजन हेच सर्वेसर्वा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापुर्वी पाच वर्षे पालकमंत्री राहिलेले गिरीष महाजन यांचे भाजप संघटनेपासून ते सत्ते पर्यंत वर्चस्व होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर महाजन यांचा शहराशी संपर्क तुटला. मध्यंतरी जळगाव मधील घटनांमुळे महाजन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे महाजन यांनी नाशिकपासून अंतर राखले परंतू याचा अर्थ अनेकांनी महाजन नाशिकच्या राजकारणापासून बाहेर फेकले गेल्याचा काढला. माजी मंत्री जयकुमार रावल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र स्थायी समिती निवडणुकीच्या माध्यमातून महाजन हेच सर्वेसर्वा असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीपासून ते सभापती पदाची बिनविरोध निवड करण्यापर्यंतच्या घटनांवर सुक्ष्म नजर ठेवून असल्याने महाजन यांच्या बाबत टायगर अभी जिंदा है असे बोलले जात आहे. कोल्हापूर, सांगली महापालिकेत बहुमत असतांनाही सत्ता गमवावी लागली मात्र नाशिक मध्ये सत्ता कायम राखण्यात यश आल्याने गिरीश महाजन यांच्यासह जयकुमार रावल यांची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

सभापती गितेंचा सत्कार 

स्थायी समितीची सत्ता मिळाल्यानंतर भाजपचे आठ नगरसेवकांनी मुंबई गाठली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन,नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल यांची भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित सभापती गिते यांचा सत्कार करण्यात आला. महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेता जगतीश पाटील उपस्थित होते. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर