नदी स्वच्छतेचा संदेश देत ‘ते’ धावले नाशिक ते त्र्यंबकेश्वर

सुभाष जांगडा,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुभाष जांगडा यांनी सोमवारी (दि. 10) नदी स्वच्छता व पाणी वाचवाचा संदेश देण्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे ३१ किमी अंतर न थांबता ३ तास २६ मिनिटांत केले पूर्ण केले. सोमवारी (दि. 10) पहाटे 5 वाजून ३० मिनिटांनी रामकुंड पंचवटी येथून नाशिक ते त्र्यंबकेश्वर धावण्यास त्यांनी सुरुवात केली. या दरम्यान ते आपल्या सोबत गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, हिमालय, कैलास मानसरोवर व गोदावरीतील जल असलेल्या जलकुंभाने त्र्यंबकराजास जलाभिषेक केला.

यावेळी त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, राजेश इसरवाल, राजेश शर्मा, राजेंद्र साहानी, राजबाला शर्मा, गंगा जांगडा, रूपाली मोंढे, योगिता निकम, प्रणिता तुंगार यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला.

नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुभाष जांगडा यांनी या अगोदर नाशिक ते शिर्डी धावत बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा आदी विषयांवर प्रबोधन केले आहे. सोमवारी ते नदी स्वच्छता व पाणी वाचवाचा संदेश देत नाशिक ते त्र्यंबकेश्वर धावले. या दरम्यान ते आपल्या सोबत गंगोत्री, यमनोत्री, हरिद्वार, कैलास मानसरोवर, गोदावरीचे तीर्थ घेऊन सकाळी रामकुंड येथून ५.३० ला सुरुवात करून ८.५६ ला त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकराजास जलाभिषेक केला.

हेही वाचा : 

The post नदी स्वच्छतेचा संदेश देत 'ते' धावले नाशिक ते त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.