नवदांपत्यांचा ‘तो’ प्रेरणादायी संकल्प! विवाहातून समाजासमोर वेगळा आदर्श; पंचक्रोशीत कौतुक

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : अनेक प्रथा- परंपरेच्या विळख्यात समाज अडकलेला आहे. विशेषतः गावखेड्यात ही परिस्थिती अधिक आहे. अशावेळी कुटुंब व्यवस्थेपलीकडे जात वेगळेपणा सिद्ध करणारी माणसे समाजात वलयांकित ठरतात. अशावेळी नवदांपत्याचा हा संकल्प अनेकांना प्रेरणादायी ठरेल. विवाह सोहळ्यात नवदांपत्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. असा कोणता संकल्प केला नवदांपत्याने?

नवदांपत्यांचा 'तो' प्रेरणादायी संकल्प!

शहरालगतच्या सायने बुद्रुकसारख्या ठिकाणी विवाहातून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला. येथील नंदू शेवाळे या शेतकऱ्याची कन्या धनश्री व निमगुले (ता. मालेगाव) येथील विश्वास कदम यांचे पुत्र सचिन यांचा विवाह नुकताच झाला. या उच्चशिक्षित दांपत्याने विवाह सोहळ्यातून मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प केला. वर सचिन एम.फार्मसी असून, वधू धनश्री बी. ए. आहे. मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनला अशा प्रकारे संबंधित कागदपत्रे सुपूर्द केली. मृत्युंजय फाउंडेशनचे डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाविषयीची माहिती देण्याबरोबरच सामाजिक आरोग्यावरही विशेष भर दिला. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

नवदांपत्याकडून नवा आदर्श

अवयवदान या विषयावर कोणी फारसा पुढाकार घेत नाही. अशावेळी नवदांपत्याचा हा संकल्प अनेकांना प्रेरणादायी ठरेल. विवाह सोहळ्यात अवयवदानाचा संकल्प करत नवदांपत्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. 

अवयवदान संबंधित हॉस्पिटल 
नाशिक- १० 
धुळे- १ 
जळगाव- ० 
नगर- १ 
नंदुरबार- ० 
अवयवदानावर काम करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील संस्था- ६ 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना स्वतः कृतिशील राहिले, तर समाज नक्की अनुकरण करेल. भविष्यातील परिस्थिती, अवयवांचा उपयोग मृत्यूनंतर इतरांना महत्त्वपूर्ण आहे. विज्ञानाच्या युगात नव्या पिढीने जागरूक राहून प्रबोधन करावे. पाच वर्षांपासून ही मानसिकता होती, लग्नात हा संकल्प पूर्णत्वास न्यावा. 
- सचिन कदम, अवयवदान संकल्पक, मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह 

 

ग्रामीण भागातील माझ्यासारख्या युवतीला वेगळेपण वाटले. मात्र जीवनसाथी यांनी केलेल्या प्रबोधनातून चांगला विचार समाजापर्यंत नेता येईल हेच माझ्या शिक्षणाचे फलित होईल. - धनश्री कदम, नववधू 

 

दर दिवशी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता अपघातग्रस्तांना अवयवांची गरज असते. मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण खूप कमी आहे. लग्नासारख्या समारंभात या जोडीने असे आठवे वचन घेतले. देशाच्या दृष्टीने आदर्शवत आहे. - डॉ. संजय रकिबे, समन्वयक, उत्तर महाराष्ट्र झोनल ट्रॉन्सप्लॉट को- ऑर्डिनेशन सेंटर, नाशिक