नवरात्रोत्सवाच्या रंगात आमदार देवयानी फरांदे यांनी सुध्दा गरबा नृत्यावर धरला ठेका

फरांदे दांडिया www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

अमृतधाम लिंक रोड परिसरातील मानेनगरमध्ये सुरू असलेल्या दांडिया उत्सवामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनाही गरबा नृत्याचा मोह आवरता आला नाही. या ठिकाणी सुरू असलेल्या गरबा नृत्यावर त्यांनी ठेका धरला अन‌् उपस्थित महिलांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले.

नवरात्रोत्सवानिमित्त मानेनगर गरबा रास-दांडियामध्ये आयोजक माजी नगरसेविका प्रियंका माने व माने फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय माने यांच्या वतीने उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या काही भगिनींना मान्यवरांच्या हस्ते दररोज पैठणी भेट दिली जाते. त्यानिमित्त सहाव्या माळेला आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आमदार फरांदे यांच्या हस्ते आरती करून पैठणीच्या मानकरी महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गरबा नृत्याचा आनंद घेत असताना आ. फरांदे यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्यासह रोहिणी नायडू, प्रियंका माने यांनीही ठेका धरत गरबा नृत्याचा आनंद लुटला. स्वत: आमदार गरबा नृत्यात सहभागी झाल्याने उपस्थित महिलांमध्येही चैतन्य संचारल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष अमित घुगे, प्रदेश सचिव विजय बनछोड, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सवाच्या रंगात आमदार देवयानी फरांदे यांनी सुध्दा गरबा नृत्यावर धरला ठेका appeared first on पुढारी.