नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

vani www.pudhari.news
नाशिक (सप्तशृंगगड) पुढारी वुत्तसेवा: तुषार बर्डे 
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होत असून दि. ८ व ९ ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवही जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. आदिमायेच्या मूर्तीस्वरुप संवर्धन करण्याच्या कामासाठी दि. २१ जुलै पासून आदिमायेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असून दोन महिन्यानंतर २६ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस भाविकांनी पहाटेपासून गर्दी करत पन्नास हजार भाविकांनी सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन घेतले.
सकाळी 8 वाजता देवीच्या अलंकाराची मिरवणुक काढुन मंदारात नेण्यात आली. यावेळी नाशिक येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी अतिरिक्त सञ न्यायाधीश वर्धन देसाई यांच्या हस्ते देवीची महापुजा झाली. तर पहिल्याच माळेला सोमवार, दि. 26 पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गडावरील 500 पायऱ्यांवरुन सुरक्षितरीत्या मंदिरात सोडण्यात आले. तसेच नवरात्रीच्या संपूर्ण दहा दिवस महाप्रसादाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान नवरात्रोत्सवाच्या उत्सव काळामध्ये ट्रस्ट व ग्रामपंचायतीने गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. याकरता नियोजन केले आहे. देवीच्या नवरुपाच्या दर्शनासाठी भाविकांची ऐतिहासिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात असून देवी संस्थान मंदीर हे चोवीस तास खुले राहणार आहे. पहाटेच मंदिरात घटस्थापना करण्यात आल्यानंतर भाविकांनी ११११ घटाची स्थापना केली. यावेळी वरूणराजाचेही आगमन झाल्याने भाविकांचह चांगलीच तारांबळ उडाली. तर भाविकांच्या अलोट गर्दीमुळे मंदिर संस्थान प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच खाजगी वाहनांना बंदी करण्यात आली असुन नांदुरी येथे मेळावा बसस्थानक तयार करण्यात आले आहे.
गेल्या दिड महिन्यापासून मंदीरातील सप्तशृंगी देवीच्या मुर्तीचे काम चालु होते. देवीचे नवीन रुप बघण्यासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याने मंदिर चोवीस खुले ठेवुन दर्शन सुलभ होईल. यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. भाविकांच्या सेवेसाठी देवी संस्थानाच्या प्रसादालयात मोफत नऊ दिवस मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. – ॲड. दीपक पाटोदकर, विश्वस्त देवी संस्थान सप्तशृंगगड.
“पहिल्या माळेला देवीच्या अलंकाराची मिरवणुक काढुन मंदिरात आणले. प्रमुख न्यायाधीश व चेअरमन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच नवनियुक्त जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देवीचे दर्शन घेतले.” – भगवान नेरकर, कार्यकारी अधिकारी, देवी संस्थान.

हेही वाचा :

The post नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन  appeared first on पुढारी.