
नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी, दि.30 येवल्यातील जगदंबा देवस्थान कोटमगाव येथील आई जगदंबा देवीचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,२००४ पासून मी या ठिकाणी येत आहे. येथील परिसरात आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून विविध विकासकामे याठिकाणी करण्यात आलेली आहेत. शुक्रवारी, दि.30 याठिकाणी आल्यावर आई जगदंबा देवीचे दर्शन घेतले असून, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर संकटातून बाहेर काढ आणि राज्यातील जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना देवीचरणी केल्याचे सांगितले. कोटमगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे गावच्या सरपंच संध्या अर्जुन कोटमे यांनी छगन भुजबळ यांचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या तसेच आलेल्या भाविकांच्या वतीने येथील भागाच्या केलेल्या विकासकामाबद्दल आभार मानले.
हेही वाचा:
- करंजी येथील सराफाला केळपिंपळगाव जवळ लुटले, मारहाणीत सराफ दाम्पत्य गंभीर जखमी
- संगमनेर : जे पार्टी जोडू शकत नाहीत ते देश काय जोडणार : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल
- Congress president election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंग यांची माघार, मल्लिकार्जून खरगेंना पाठिंबा
The post नवरात्रोत्सव : भुजबळ यांनी घेतले कोटमगावच्या जगदंबा देवीचे दर्शन appeared first on पुढारी.