नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण – 2020 जाहीर; शेतकऱ्यांना होणार फायदा

नाशिक : शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी कृषीपंपाची थकबाकी वसुली तसेच, नवीन कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या यशस्वीतेसाठी महावितरणतर्फे नियोजन करण्यात आले आहे. त्यात, पुढील तीन वर्षांत ग्राहक आणि शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता सर्व कृषी ग्राहकांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीजपुरवठा मिळावा देण्याचे नियोजन आहे. 

कृषी वीज धोरण २०२० जाहीर

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार नवीन सर्वंकष कृषी वीज धोरण २०२० जाहीर केले आहे. त्यात कृषीपंपांना २०० मीटरपर्यंत लघुदाब वाहिनीद्वारे नवीन वीजजोडणी, २००ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वाहिनीद्वारे (HVDS) नवीन वीजजोडणी, ६०० मीटरवरील कृषिपंप ग्राहकांना सौरकृषिपंपाद्वारे नवीन वीजजोडणी तसेच विद्यमान कृषिपंप ग्राहकांना पारेषणविरहित सौर कृषिपंप घेण्याचा पर्याय आहे. 

चालू बिलावर सवलत 

नवीन कृषी धोरणात कृषी पंपधारक ग्राहकांना थकबाकीतून मोठा दिलासा मिळणार आहे. या धोरणात सहभागी होणाऱ्या सर्व कृषी ग्राहकांचा पाच वर्षांपर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब शुल्क आकार पूर्णपणे (१०० टक्के) माफ करण्यात येऊन या थकबाकीवरील व्याज १८ टक्क्यांपर्यंत न आकारता वीज नियामक आयोगाने दिलेल्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारणी करून थकबाकी निश्चित केली आहे. 

थकबाकीवर सूट 

पाच वर्षांपूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ करून केवळ मूळ थकबाकीच वसुलीसाठी ग्राह्य धरली आहे. धोरणात कृषीपंप ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून, दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के व तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीजबिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. 

ग्रामपंचायतींना बिल भरणा केंद्र 

वीजबिल थकबाकी वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीला वीजबिल भरणा केंद्र म्हणून प्रतिवीजबिल वसुलीपोटी पाच रुपये, थकबाकी वसूल केल्यास, वसूल केलेल्या थकबाकीच्या ३० टक्के रक्कम, चालू वीजबिल वसूल केल्यास वसुली रकमेच्या २० टक्के मोबदला देण्याचे धोरणात प्रस्तावित आहे. गावपातळीवर सहकारी संस्था, महिला बचतगट, “महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांची ‘वीज देयक संकलक एजन्सी’ म्हणून नेमणूक करण्यात येईल. शेतकरी सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांना वसूल केलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. 

नवीन कृषी धोरणाची वैशिष्ट्ये 

कृषी ग्राहकांना कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीजपुरवठा 

कृषीपंपांना २०० मीटरपर्यंत लघुदाब वाहिनीद्वारे वीजजोडणी 

२०० ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वाहिनीद्वारे वीजजोडणी 

६०० मीटर कृषिपंपांना सौरपंपाद्वारे नवीन वीजजोडणी 

कृषीपंप ग्राहकांनी थकबाकी भरल्यास ५० टक्के अतिरिक्त सूट

दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के अतिरिक्त सूट 

तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

• थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना योजनेच्या कालावधीत चालू वीजबिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत. 

• थकबाकी वसुली करणाऱ्यांसाठी नव्या धोरणात विविध प्रोत्साहनपर योजनांचा समावेश 

• थकबाकी वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीला वीजबिल भरणा केंद्र म्हणून प्रतिवीजबिल वसुलीसाठी पाच रुपये 

• थकबाकी वसूल केल्यास ग्रामपंचायतीला वसूल केलेला थकबाकीच्या ३० टक्के रक्कम 

• चालू वीजबिल वसूल केल्यास ग्रामपंचायतीला वसुली रकमेच्या २० टक्के मोबदला 

• गावपातळीवर सहकारी संस्था, महिला बचतगट, ‘महिलांचा स्वयंसहाय्यता गट’ इत्यादींची ‘वीज देयक संकलक एजन्सी’ म्हणून नेमणूक व त्यांनादेखील वरील प्रोत्साहन 

• थकबाकीची रक्कम वसूल केल्यास शेतकरी सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांना वसूल केलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम प्रोत्साहन 

• ग्राहकाने भरणा केलेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्राहकाच्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी 

• ग्राहकाच्या भरणा रकमेपैकी आणखी ३३ टक्के रक्कम ही ग्राहकाच्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल