नांदगावच्या ४४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा; आमदारच्या नेतृत्वाखाली विजय

नांदगाव (नाशिक) : नांदगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीं साठी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. या ५९ पैकी ४४ ग्रामपंचायतींवर आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकला. 

पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित

५९ पैकी पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने ५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येऊन त्यांचे निकाल जाहीर झाले. ४४ ग्रामपंचायतींवर आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पॅनल निवडून आले. तीन ग्रामपंचायतींमध्ये मित्रपक्षांसोबत एकत्रित सत्ता आल्यामुळे नांदगाव तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. आमोदे, कळमदरी, वेहेळगाव, मळगाव, नवे पांझण, सावरगाव, जळगाव बुद्रुक, जळगाव खुर्द, चिंचविहीर, रणखेडा, पोखरी, पिंप्रीहवेली, दहेगाव, हिंगणेदेहरे, बोराळे, माणिकपुंज, तांदुळवाडी, मोरझर, बोलठाण, जवळकी, कुसुमतेल, बाणगाव, खुर्द, टाकळी बुद्रुक, ढेकू खुर्द, कासारी, सोयगाव, जातेगाव आदी ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली. निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे आमदार सुहास कांदे यांनी अभिनंदन केले. 

शिवनेरी पॅनलला चार जागा

नांदगाव/बाणगाव बुद्रुक - ढेकू खुर्द येथे नऊपैकी आठ जागांवर नाथकृपा पॅनलचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवार असे - आनंदराव सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, परिघा चव्हाण, अवलीबाई चव्हाण, ज्योती सूर्यवंशी, कल्पनाताई सूर्यवंशी, बाबासाहेब शिंदे. सोयगाव ग्रामपंचायतीत माजी उपसभापती भाऊसाहेब सदगीर यांच्या कालभैरव पॅनलने नऊपैकी चार जागांवर बिनविरोध विजय संपादन केल्यानंतर उर्वरित पाच जागांवर विजय संपादन केला. याच गावातील नंदू सानप व बालनाथ सदगीर या दोघांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली. यात बाळनाथ सजगीर विजयी झाले. माणिकपुंज येथे नऊपैकी प्रगती पॅनलला पाच जागा, तर मधुकर दरेकर यांच्या नऊपैकी माजी सरपंच अशोक कोल्हे यांच्या प्रगती पॅनलला पाच जागा राखता आल्या. मधुकर दरेकर यांच्या शिवनेरी पॅनलला चार जागा मिळाल्या. 

नवनाथ महाराज पॅनल नऊपैकी सात जागा 

आमोदे ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच वैशाली पगार, विठ्ठल पगार व भगवान पगार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या नवनाथ महाराज पॅनलने नऊपैकी सात जागा जिंकल्या. भूषण पगार, विठाबाई कुवर, सीमा पाटील, विठ्ठल पगार, योगिता पगार, रघुनाथ सोनवणे, माया दळवी, वैशाली पगार, राजेंद्र पगार विजयी झाले. हिसवळ खुर्द येथे संजय आहेर, विजय आहेर यांच्या पॅनलने नऊपैकी सात जागांवर विजय मिळविला. त्यात संजय आहेर, नानासाहेब आहेर, सरस्वती लोखंडे, नवनाथ आहेर, मनीषा आहेर, कैलास फुलमाळी, वैशाली आहेर विजयी झाले. 

विकास पॅनलचा नऊपैकी नऊ जागांवर विजय 

वाखारी येथे परिवर्तन विकास पॅनलला नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळाला. विजय सोनवणे, अनिता काकळीज, सुंदराबाई शेरमाळे, कौतिक काकळीज, योगेश चव्हाण, सुशीला काकळीज, चिंधा चव्हाण, संगीता काकळीज, सोनाली भंडागे, भौरी येथील डॉ. सागर भिलोरे यांच्या जय बजरंग विकास पॅनलने तालुका पंचायत समितीचे विद्यमान सभापती भाऊसाहेब हिरे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत पराभव करीत सातपैकी पाच जागांवर विजय मिळविला. सभापती हिरे यांना अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

शैनेश्वर पॅनलचे सात जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व

बोलठाण येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत शैनेश्वर पॅनलने सात जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. नहार पुरस्कृत नम्रता पॅनलने पाच जागांवर विजय मिळविला. एक जागा बिनविरोध झाली. शनैश्वर पॅनलचे विजयी उमेदवार वाल्मीक गायकवाड, अनिल सोनवणे, अंजुम पठाण, कविता रिंढे, विष्णू बारवकर, मंगलाबाई कायस्थ, उज्ज्वला नवले, नम्रता पॅनलचे विजयी उमेदवार : सुनीता भगवान बनकर, कांताबाई काळे, गणेश व्यवहारे, सुभाष नहार, नितीन कायस्थ.  

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना