नांदगावात तीन दिवसाचा जनता कर्फ्यु; यंत्रणा अँक्शन मोडवर

नांदगाव (जि.नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे नांदगाव नगरपालिकेचा तीन दिवसाचा जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे .मुख्याधिकारी गोसावी यांनी याबाबत माहिती दिली. शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस कडक लॉकडाऊन राहणार आहे.

यंत्रणा अँक्शन मोडवर

दुधविक्री सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ तर भाजीपाला फळविक्रेते सह सर्व आस्थापना कडकडीत बंद पाळणार आहेत. दवाखाने औषधविक्री सुरु राहणार. काल (ता.१७) आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत यंत्रणेतील विसंवाद उघडा पडला होता.आजपासून यंत्रणा अँक्शन मोडवर आल्याने कोरोना प्रार्दुभावावर नियंत्रित होण्याची अपेक्षा वाढली.