नांदगाव : पुढारी वृत्तसेवा; नांदगाव – येवला रस्त्यावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात चारचाकी वाहनाखाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक माहितीनुसार, नांदगाव येवला रस्त्यावर मल्हारवाडी गावाजवळ आज शुक्रवार (दि. १) सकाळच्या सुमारास (MH 15 FE 3082) क्रमाक असलेल्या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील महिला सुनीता माणिकराव जाधव (वय ५० ) यांचा चारचाकी वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी स्वार भिकन महादू वाळुंजे (वय ६३) रा ,नाशिक हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती नांदगांव पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रतिम चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे हे तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविले तर मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास नांदगांव पोलीस करत आहे.
The post नांदगाव-येवला रस्त्यावर भीषण अपघात, चिरडून महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.