नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

जुने नाशिक : नांदगाव वाखारी येथे ऑगस्ट २०२० मध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचा भयंकर प्रकार घडला होता. दरम्यान या घटनेचा कुठलाही पुरावा नसल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांपुढे गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र मोठ्या शिताफीसीने नऊ महिने आणि दिडशेहून अधिक जणांच्या जबाब घेतल्यानंतर या हत्याकांडाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आणि अख्खा जिल्हा हादरला..!

६ऑगस्ट २०२० रोजी नांदगाव वाखारी शिवारात झोपेत असताना चव्हाण कुटूंबीयांवर अज्ञात संशयीतानी हल्ला केला. पती समाधान आण्णा चव्हाण (वय.३५), पत्नी भारती समाधान चव्हाण (वय.२६) तसेच मुलगी आराध्या समाधान चव्हाण (वय.७) आणि मुलगा अनिरुद्ध समाधान चव्हाण (वय.५) आशा पाच जणांची हत्या करत पळ काढला होता. घटनेने संपुर्ण नाशिक जिल्हा हादरला होता. महत्वाचे म्हणजे हत्याकांडाचे कुठल्याही प्रकारचे धागेदोरे पोलिसांच्या हाती नसल्याने तपास करणे अडचणीचे झाले होते. मिळकतीच्या वादातून हत्याकांड झाले आहे. का आशा सर्व बाजूनी पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यानी विविध प्रकारची वेषभूषा करत नऊ महिने संशयीताच्या मागावर होते. त्यासाठी त्यानी मानसरोग तज्ञांची देखील मदत घेतली. १५० हून अधिक जणांचे जबाब नोंदविले. काही सराईत टोळ्यांना ताब्यात घेतल्या आणि त्यांचा तपास केला.

असा लागला तपास

संशयीत सचिन उर्फ बोंग्या उर्फ पवन सखाहरी चव्हाण (रा. पढेगाव, कोपरगाव), सचिन विरुपन भोसले (रा. शिरोडी, औरंगाबाद) तसेच संकेत उर्फ संदिप महेंद्र चव्हाण (रा.कडेगाव अहमदनगर) तीघे हत्याकांड काळात संशयास्पद वागत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. अधिक चौकशीत मुख्य संशयीत सचिन (बोंग्या) चव्हाण त्यावेळी वाखारी शिवारात वास्तव्यास असल्याचे समजले. त्यांची अधिक माहिती घेतली असता तीघांनीच गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसानी बोंग्या आणि सचिन भोसलेस ताब्यात घेतले. दरम्यान स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे याना तीसरा संशयीत दहा मैल भागात येत असल्याची माहिती मिळाली. त्यास सापळा रचून ताब्यात घेतले.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

..म्हणून केली हत्या, संशयितांना सांगितले कारण

संशयीतानी घरात चोरीचा प्रयत्न केला. त्यांना काही मिळून आले नाही. आवाजाने मृत भारती चव्हाण आणि समाधान चव्हाण जागे झाल्याचे लक्षात आल्याने संशयीतानी प्रथम दोघांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या मुलांचा आवाज आल्याने त्या दोघांचीही हत्या केल्याची कबूली संशयीतानी दिल्याची माहिती पोलिस अधिक्षक सचिन पाटील यानी दिली. चोरी आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी त्यानी हत्याकांड घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. यात आणखी संशयीत असल्याची शक्यताही पोलिसानी व्यक्त केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, कर्मचारी रविंद्र शिलावट, रविंद्र वानखेडे, नंदु काळे, संजय गोसावी, विश्‍वनाथ काकड, सागर काकड, प्रविण सानप, सतिष जगताप, हरिष आव्हाड, कुणाल मोरे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गौरव, पगारे यानी गुन्ह्याची उकल केली. तीघा संशयीताना न्यायालयात हजर केले असता सोमवार (ता.१२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोका लावण्याची तयारी 

संशयीत सराईत आहेत. त्यानी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, येवला औरंगबाद येथील वैजापूर, गंगापुर, आणि अहदनगर येथील कोपरगाव, जिल्ह्यात दरोडा, जबरीचोरी, घरफोडी तसेच चोरी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासाठी संशयीत संशयीत घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर मोका लावण्याची तयारी सुरु असल्याचेही पाटील यानी सांगीतले. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी