
धर्माबाद तालुका प्रतिनिधी, जालना येथे आरक्षण संदर्भात अंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांवर तेथील पोलीस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज करुन आरक्षणाचे अंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. ह्या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.4 ) सकल मराठा समाजाच्या वतीने धर्माबाद तालुका बंदची हाक देण्यात आली होती. या बंद ला भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याने धर्माबाद कडकडीत बंद पाळण्यात आले.
लाठीचार्ज करणाऱ्यास तत्काळ निलंबित करण्यात यावे
आज (दि.4 )सकाळी 10 वाजता धर्माबाद शहरांतील शिवतीर्थ येथून तालुका सह परिसरातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, समाजाच्या कार्यकर्त्यांवर, माता भगिनींवर लाठीचार्ज करणाऱ्यास तत्काळ निलंबित करण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
शहरासह ग्रामीण भागातील शाळा, पतसंस्था, व्यापारीपेठा पूर्णपणे बंद होत्या. यावेळी विविध सामाजिक संघटना यांनी देखील पाठींबा दिला होता. तहसिलदार शंकर हांदेशवार यांना उपस्थीत महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार न घडता अतिशय शांततामय वातावरणात धर्माबाद कडकडीत बंद पाळण्यात आले. पोलिश निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकल मराठा समाज धर्माबाद तालुक्याच्या वतीने देण्यात आलेले निवेदन तत्काळ सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी तहसीलदार शंकर हांदेशवार यांनी सांगितले.
हेही वाचा
- खासगी कंपन्यांऐवजी भरती एमपीएससीमार्फतच करावी : स्पर्धा परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाची मागणी
- आता शिक्षकांचीही होणार परीक्षा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाचा निर्णय
- Maratha Reservation Protest: जालना घटनेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी संतप्त पडसाद
The post नांदेड : धर्माबाद कडकडीत बंद, मराठा समाजाच्या वतीने शासनाला दिले निवेदन appeared first on पुढारी.