
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात नाफेड आणि भारतीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) मार्फत कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरूवारी सायंकाळी काढले. तसेच ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत बाजार समिती आवारात कांदा खरेदी केली जाणार नाही, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा असे आदेशही शर्मा यांनी दिले आहेत. याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी पाठपुरवठा केला होता.
तीन दिवसांच्या संपानंतर गुरूवारी (दि. २४) जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खुल्या झाल्या. बाजार समित्यांच्या आवारात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले. सरासरी १९०० ते दोन हजार रूपये प्रति क्विंटल दराने कांदा विक्री झाला. परंतु कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात नाफेड व एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत व नाफेडने जाहीर केल्यानुसार २४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करावा अशी मागणी करीत शेतकरी व शेतकरी संघटना प्रतिनिधींनी लिलाव बंद पाडले.
हेही वाचा :
- निपाणीत बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग; ५ लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही
- डिप्रेशन जाणवतेय, मानसिक आजार ओळखायचा कसा?
The post नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.