नारीच्या चारित्र्याची अमानुष परिक्षा? VIRAL VIDEO मधील प्रथेविरोधात जनतेत संताप

नाशिक : काही दिवसांपासून सोशल मीडियावर चारित्र्याच्या संशयावरून महिलेची भीतीदायक परीक्षा द्यावी लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायत समितीच्या अमानवीय प्रथेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. काय आहे त्या व्हिडिओत? ज्याने संताप व्यक्त होत आहे.

काय दिसते व्हिडिओत? 
एका समाजातील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशा वेळी जातपंचायत विचित्र न्यायनिवाडा करून महिलेचे चारित्र्य तपासते. पतीने तीन दगडांची चूल मांडली. सरपण लावून चूल पेटवली. चुलीवर तेल टाकलेली कढई ठेवली. तेलाला उकळी आल्यावर नवऱ्याने पाच रुपयांचे नाणे त्या तेलात टाकले व ते नाणे रिकाम्या हाताने बाहेर काढण्यास सांगितले. महिलेने खूप विरोध करूनही पतीने तिचे चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली जात असल्याचे दिसत आहे. 

अमानुष प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
काही दिवसांपासून सोशल मीडियावर चारित्र्याच्या संशयावरून एका समाजातील जात पंचायतीसमोर महिलेला उकळत्या तेलात हात घालून परीक्षा द्यावी लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायत समितीच्या अमानवीय प्रथेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. जात पंचायतीचे अघोरी व अन्यायी न्यायनिवाडे व शिक्षेचे प्रकार पाहण्यास मिळाले. यामध्ये विशेषतः महिला बळी पडल्याचे दिसून येत आहे. नुकताच अशा न्यायनिवाडा करण्याचा एक अमानुष प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियात फिरत आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
अमानवीय प्रथा 
राज्यातील काही मागास समाजात महिलेला उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढून चारित्र्याची परीक्षा द्यावी लागते. महिलेचा हात भाजला नाही, तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते व हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असे समजले जाते. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची चौकशी होऊन जात पंचायतविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाकडे या घटनेचा पाठपुरावा सुरू आहे. 
- कृष्णा चांदगुडे (कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान)  

कारवाई करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

महिलेच्या चारित्र्याच्या संशयावरून तिला जातपंचायतीने उकळत्या तेलात हात घालून परीक्षा देण्याचा निवाडा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात अमानवीय प्रथेत सहभागी असलेल्या जात पंचायतीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.