नाशकात सावत्र आईकडून लेकराचा अमानुष छळ,आईविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा,जखमी मुलावर उपचार सुरू

<p>सावत्र&nbsp;आईने&nbsp; क्रौर्याची परिसीमा केल्याची घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडली आहे. दहा वर्षाच्या चिमुकल्या मुलाला अमानुष मारहाण करत गुप्तांगाला चटके दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मोठ्या भावाने मारहाण केल्याचा कांगावा महिला करत आहे.</p>