नाशिक : देशाच्या उत्तरेकडे बर्फ वर्षाव, तर दाक्षिणात्य भागात वादळाची परिस्थिती असताना, नाशिकच्या पाऱ्यात मात्र घरसण होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. २६) नाशिकचे किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर शुक्रवारी (ता. २७) नाशिकचे कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. वातावरणातील शीतलहरींनी नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.
कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस
दिवाळीनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत कमाल तापमान व किमान तापमानात खूप तफावत राहत होती. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हे अंतर कमी होऊ लागले आहे. गुरुवारी नाशिकचे किमान तापमान १४.३ अंश, तर कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी किमान तापमान १३.४ अंश, तर कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस राहिले. यंदाच्या हिवाळ्यात नाशिकचे नीचांकी तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते.
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार
त्यानंतर काही दिवस तापमानात वाढ जाणवली. आता पुन्हा गारठा वाढू लागल्याने शहरी, तसेच ग्रामीण भागात याचा प्रभाव जाणवू लागला आहे. सायंकाळी रस्ते, चौक लवकर ओस पडू लागले आहेत. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार असल्याने गारठा नाशिककरांची चांगलीच परीक्षा घेणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली