नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही

जल

नाशिक : मुकणे आणि गंगापूर धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनवरील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि.20) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, रविवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलसाठी महावितरण कंपनीच्या गोंदे येथील रेमण्ड उपकेंद्रामधील एक्स्प्रेस फीडरवरून वीजपुरवठा केला जातो. या केंद्रामधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

तसेच गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनमधील दुरुस्तीची कामेदेखील करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि.20) सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांवरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा दोन्ही वेळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

हेही वाचा :

The post नाशिककरांनो आजच पाणी भरुन ठेवा, उद्या नळाला पाणी नाही appeared first on पुढारी.