नाशिककरांनो, काळजी घ्या! पंचवटी विभागात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक 

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण ७० टक्क्यांनी अधिक असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी असल्याची बाब समाधानकारक आहे. परंतु आतापर्यंत शहरात मृत्यू झालेल्या एक हजार ७५ पैकी साठ व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची बाब महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. विभागनिहाय विचार करता सर्वाधिक मृत्यू पंचवटी विभागात झाले असून, त्याखालोखाल पूर्व विभागात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आढळून आले आहे. 

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शहरात कोरोनाने शिरकाव केला. गोविंदनगर भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर वडाळागाव, जुने नाशिक, सातपूर व सिडको विभागाला कोरोनाने घेरले. पंचवटी विभागात कोरोना संसर्ग उशिरा अधिक वेगाने पसरला, मात्र सर्वाधिक संख्या याच विभागात आढळून आली. १९ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत शहरात एक हजार ७५ जणांचा कोरोनाने बळी घेतले असून, पंचवटी विभाग यात आघाडीवर आहे. सिडको विभागात आतापर्यंत १९३ मृत्यू झाले. पूर्व विभागात २२२, नाशिक रोड विभागात २१९, पंचवटी विभागात २३०, सातपूर विभागात ८५, पश्‍चिम विभागात १२६ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ७७१ पुरुष, तर ३०४ महिला आहेत. 

 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

गंभीर आजाराचे मृत्यू 
- मधुमेह- ११९ 
- अतिताण- ६२ 
- ह्रदयरोग- २९ 
- किडनी- २ 
- श्‍वसनाचे आजार- १२१ 
- इतर आजार- २२ 
---------------- 
वयोमानानुसार मृत्यू 
- १५ वर्षांखालील मृत्यू-१ 
- १५-३० वयोगटातील मृत्यू- २० 
- ३०-४० वयोगटातील मृत्यू- ६९ 
- ४०-५० वयोगटातील मृत्यू- १२० 
- ५०-६० वयोगटातील मृत्यू- २५५ 
- ६० पेक्षा अधिक वयोगटातील मृत्यू- ६१० 
------------------ 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

रुग्णालयात दाखल दिवसांपासूनचे मृत्यू 
- शू्न्य दिवस- ९८ 
- एक दिवस- १०७ 
- दोन दिवस- १२५ 
- तीन दिवस- १०२ 
- चार दिवस-१०१ 
- पाच दिवस- ७२ 
- सहा दिवस- ४४ 
- सात किंवा त्यापेक्षा अधिक दिवस उपचारानंतर- ४१०