नाशिककरांनो काळजी घ्या! वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम, दीड हजार रुग्णांना ताप

नाशिक : तापाचे रुग्ण वाढले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन अनेक जणांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरात दीड हजाराहून अधिक तापाचे रुग्ण आढळून आले असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांकडून अजूनही महापालिकेकडे माहिती दिली जात नसल्याने रुग्णांच्या आकडेवारीबाबत साशंकताच आहे.

शहरात नोव्हेंबर महिन्यात डायरियाचे 400 रुग्ण आढळून आले असून, विषमज्वराचे 10 रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मनपाच्या रुग्णालयांमध्ये 1,226 तापाचे रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुणियाचा रुग्ण आढळला आहे. स्वाइन फ्लूचे ऑगस्ट महिन्यात 102 सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबर महिन्यात 14 रुग्ण आढळले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात डेंग्यूचे 15 रुग्ण आढळून आले होते. फेब—ुवारी महिन्यात 11, तर मार्च महिन्यात दोन रुग्ण आढळले होते. एप्रिल महिन्यात 6, मे महिन्यात 11, तर जुलै महिन्यात 23, ऑगस्ट महिन्यात 99 आणि सप्टेंबर महिन्यात 139 बाधित रुग्ण आढळून आले होते. ऑक्टोबर महिन्यात 146 तसेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 82 रुग्ण आढळले होते.

हेही वाचा :

The post नाशिककरांनो काळजी घ्या! वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम, दीड हजार रुग्णांना ताप appeared first on पुढारी.