नाशिककरांनो.. केशरी शिधापत्रिका असेल तर घ्या लाभ!

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील ज्या केशरी शिधापत्रिकाधारकांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षेत समावेश झालेला नाही, अशांना रेशन दुकानात सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

..अशा केशरी शिधापत्रिकाधारकांनी घ्या लाभ

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, प्रतिकिलो रुपये आठ दराने, दोन किलो तांदूळ प्रतिकिलो रुपये १२ अशा सवलतीच्या दरात मिळणार आहे. शहरातील धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तसेच ज्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षेत समावेश नाही, अशा केशरी शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ रेशन दुकानातून घ्यायचा आहे.  स्वस्त दरातील धान्याचा लाभ केशरी शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच