नाशिककरांनो! सोनं घ्यायला सराफ बाजारात जात असाल तर हे वाचा

नाशिक : सोमवारपासून सराफ बाजार सुरू होणार असल्याचे संदेश काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसारित होत होता. तसेच विविध व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन दुकाने उघडे करणार असल्याचे सांगण्यात आले होते

प्रशासनाच्या आदेशानंतरच सराफ पेढ्या उघडणार 

नाशिक सोमवारी (ता. १२) प्रत्याक्षात मात्र किराणा दुकानदारांव्यतिरिक्त बाजारपेठे बंद असल्याचे दिसून आले. सराफ बाजारदेखील संपूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर शहराच्या अन्य भागातील सराफी दुकानदेखील बंद असल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. तसेच नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. सद्याची परिस्थिती बघता कोरोनाबांधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अशावेळेस जर व्यवसाय बंद ठेवून गर्दीवर नियंत्रण मिळून रुग्णांची संख्या घटणार असल्यास सरकारने काही दिवस व्यवसाय बंद ठेवण्यात निर्णय घेतला असेल तर त्यास आमचे समर्थन असणार आहे. त्या मुळे सोमवारीदेखील आम्ही सराफ बाजारासह शहराच्या विविध भागातील आमच्या सराफी दुकान पेढ्या बंद ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाचा ब्रेक द चैन उपक्रमांतर्गत जो निर्णय घेतील त्याचे आम्ही समर्थन करतो. येत्या काळात बाजार उघडण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाचा जो निर्णय असेल त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

प्रशासनांचे आदेश येत नाही तोपर्यंत सराफी पेढ्या आणि दुकान बंद

मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनांचे आदेश येत नाही तोपर्यंत सराफी पेढ्या आणि दुकान बंद ठेवण्याचा निर्णय दि नाशिक सराफ असोसिएशन धर्मकाटातर्फे घेण्यात आला आहे. प्रशासनांच्या विरोधात जाऊन सराफ बाजार उघडे केले जाणार असल्याच्या कुठल्या अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी केले आहे. 

 भाजी आणि फुल विक्रेत्यांचे अतिक्रमण 
जिल्हा प्रशासनांच्या आवाहनास प्रतिसाद देत सराफी व्यावसायिकानी सोमवारीदेखील सराफ बाजार बंद ठेवला. परंतु तरीदेखील बाजाराच्या काही भागात नागरिकांची गर्दी दिसून आली. भाजी आणि फुल विक्रेत्यानी सराफ बाजार बंद असल्याची संधी साधत दुकाने थाटली. नागरिकांनी भाजी आणि फुल खरेदीसाठी त्या दुकानांवर गर्दी केली. त्यांच्यावर आळा बसवा, अशी मागणी व्यावसायिकानी केली. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

नागरिकांचा जीव वाचविण्याच्या निमित्ताने प्रशासनाने घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. सद्याची परिस्थिती बघता प्रशासनाचा जो निर्णय असेल त्यास असोसिएशनचा पाठिंबा राहील. त्यांच्याकडून आदेश येत नाही तोपर्यंत दुकान उघडणार नाही. 
-गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन 

 हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

नाशिककरांचा जीव महत्त्वाचा आहे. कुणी दुकान उघडले तर जिल्हा प्रशासन किंवा पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केल्यास त्यास असोसिशन हस्तक्षेप करणार नाही. 
-किशोर वडनेरे, सेक्रेटरी  
 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू