नाशिककर गारठले! वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे अनुभव

नाशिक : वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हैराण केले होते. सध्या फेब्रुवारी महिन्‍यात वातावरणातील गारठ्याने नाशिककरांमध्ये हुडहुडी भरली आहे. सोमवारी (ता. ८) नाशिकचे किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

नाशिककरांना पुन्‍हा भरली हुडहुडी; 
यापूर्वी नोव्‍हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्‍यांतील काही दिवस सोडल्‍यास यंदाच्‍या हिवाळी हंगामात फारसा गारठा जाणवला नव्‍हता. परंतु आता फेब्रुवारी महिन्‍यातील गारठा नाशिककरांची चांगलीच परीक्षा घेतो आहे. गेल्‍या काही दिवसांपासून नाशिकच्‍या किमान तापमानात सातत्‍याने घट नोंदविली जात आहे. रविवारी (ता. ७) तापमान दहा अंशांपर्यंत घसरले होते.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

किमान तापमान ९.२ अंशांवर 

सोमवारी (ता. ८) किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस असल्‍याची नोंद झालेली आहे. कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आणखी काही दिवस वातावरणात अशाच प्रकारे थंडी राहणार असल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच