नाशिकचा पारा पंधरा अंशांवर कमाल तापमान ३१.३ अंश 

नाशिक : वातावरणात गारठा जाणवू लागल्‍यानंतर तापमानात घट नोंदविली जात आहे. सोमवारी (ता.२३) जिल्ह्या‍चे किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस राहिले. कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

तापमान वीस अंश सेल्सिअसच्‍या जवळपास

सायंकाळनंतर वातावरणात अधिक प्रमाणात गारठा जाणवू लागला. यंदाच्‍या हिवाळी हंमागात दिवाळीपूर्वी नाशिकचे तापमान दहा अंश सेल्सिअस‍पर्यंत खालावले होते. मात्र दिवाळीच्‍या कालावधीत तापमानात वाढ होऊन किमान तापमान वीस अंश सेल्सिअसच्‍या जवळपास असल्‍याची नोंद घेण्यात आली. या कालावधीत कमाल व किमान तापमानात तफावत जाणवत होती. परंतु आता तापमानात सातत्‍याने घट होऊ लागली आहे. रविवारी (ता.२२) किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस होते. त्‍यात आणखी एक अंश सेल्सिअसची घट होऊन सोमवारी पंधरा अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

वातावरणातील गारठा जाणवू लागला

रविवारप्रमाणे सोमवारीही कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस इतके असल्‍याची नोंद घेण्यात आली. ग्रामीण भागात मोकळा परिसर असल्‍याने वातावरणातील गारठा जाणवू लागला आहे. यामुळे गावपाड्यावरील चौकांत सायंकाळी लवकर शुकशुकाट जाणवतो.  

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता