Site icon

नाशिकचा पारा ३७.५ अंशावर स्थिर; उकाडा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरातील तापमानाचा पारा ३७.५ अंशावर स्थिरावला. उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

चालू महिन्यात ऊन चांगलेच तापले असून शहराचा पारा थेट चाळीस अंशापलीकडे जाऊन पोहचला होता. सध्या पारा ३८ अंशाच्या खाली असला तरी उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारांमध्ये नाशिककर भिजून निघत आहेत. उकाड्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरवासीय जागरण करत आहेत. दरम्यान, रविवारी (दि.२१) सुट्टी असूनदेखील ऊन्हाचा कडाका अधिक असल्याने शहरवासीयांनी घरातच बसणे पसंत केले. त्यामुळे शहरातील प्रमुख भाग व उपनगरांमधील रस्त्यांवर सामसूम पाहायला मिळाली. तसेच उष्णतेपासून बचावासाठी एसी, पंखे, कुलरची हवा घेणे पसंत केले. दुसरीकडे ग्रामीण भागालाही उन्हाचे चटके बसत आहेत. तीव्र ऊकाड्यामुळे शेतीची कामे खोळंबत असून दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकचा पारा ३७.५ अंशावर स्थिर; उकाडा कायम appeared first on पुढारी.

Exit mobile version