नाशिकचा वैद्यकीय विभाग कोरोनाच्या विळख्यात; प्रशासनाची चिंता वाढली

नाशिक : राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या दररोज नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. बुधवारी (ता.२४) जिल्‍हाभरात तब्‍बल ३ हजार ३३८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, पहिला रुग्‍ण आढळल्‍यापासून प्रथमच तीन हजाराहून बाधित एका दिवसात आढळले आहेत.

यातच मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि दोन मुख्य सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ आवेश पलोड यांना करोनाची लागण, वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यासह अधिकारी देखील करोनाच्या विळख्यात सापडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली.

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

जिल्ह्यात कोरोनामुळे बळींच्‍या संख्येतही वाढ होत असून, दिवसभरात पंधरा बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक दहा मृत नाशिक शहरातील आहेत. २ हजार २२४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. कोरोनाचा पहिला बाधित गेल्‍या वर्षी २९ मार्चला आढळला होता. त्‍यानंतर जुलै-ऑगस्‍ट महिन्‍यात जिल्‍ह्‍यात रुग्‍णसंख्या वाढीने उच्चांकी गाठली होती. परंतु त्‍यानंतरच्‍या काळात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांचा आलेख खालावत होता.परंतु गेल्‍या काही दिवसांपासून दर दिवशी आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या नवनवीन उच्चांक गाठते आहे.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ