Site icon

नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ओझर येथील नाशिक विमानतळावरून अगोदरच दोन कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून आपल्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असताना, आता धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव दि. 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान तब्बल 13 दिवस विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या नाशिक विमानतळावरून स्पाइस जेट या कंपनीद्वारे नवी दिल्ली आणि हैदराबाद या दोन सेवा सुरू आहेत.

ओझर विमानतळाची मालकी असलेल्या हिंदुस्थान एरोनोटिक्स लिमिटेडने (एचएएल) दिलेल्या माहितीनुसार दि. 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळात सलग 13 दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये नाशिक विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. दरवर्षी अशा प्रकारचे काम करण्यात येत असते. या कामादरम्यान कुठलेही विमान धावपट्टीवर उतरविले जात नाही किंवा उड्डाण घेऊ शकत नाही. दरम्यान, सध्या या धावपट्टीवरून स्पाइस जेट या कंपनीची नवी दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू आहे. मात्र, आता ही सेवा तब्बल 13 दिवस बंद ठेवली जाणार आहे, तर दि. 4 डिसेंबरपासून धावपट्टी नियमित उपलब्ध राहणार आहे.

आजही नाशिक विमानतळावर लॅण्डिंग
स्पाइस जेट कंपनीच्या वतीने चेन्नई ते शिर्डी विमानसेवा दिली जाते. तांत्रिक कारणास्तव चेन्नईचे विमान सोमवारी (दि. 31) शिर्डीऐवजी नाशिक विमानतळावर उतरविण्यात येणार असल्याचे कंपनीने प्रवाशांना कळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीच्या विमानाचे लॅण्डिंग नाशिक विमानतळावर केले जात आहे. त्यानंतर प्रवाशांना कंपनीच्या बसेसमधून शिर्डीपर्यंत पोहोचविले जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद appeared first on पुढारी.

Exit mobile version