नाशिकचे जिल्हाधिकारी आणि दातार लॅबमध्ये पॅचअप! लॅब पूर्ववत सुरू, दावाही नाही

नाशिक : बोगस कोरोना अहवालाच्या कारणावरून सुरू असलेला जिल्हा यंत्रणा आणि दातार जेनेटिक्स लॅब यांच्यातील तिढा मिटला आहे, आज उभयतांमध्ये बैठक झाल्यानंतर दोन्ही बाजूकडून हा विषय गैरसमजतीतून घडल्याचे म्हटले आहे.

दातार लॅबवरील घातली होती बंदी

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये प्रयोगशाळेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत  तफावत असल्याच्या चर्चेनंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक व नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या लॅबचे कामकाज आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सुरू आहे की नाही हे तपासण्याच्या दृष्टीने 27 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश काढले होते.  तसेच शासकीय व खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्यांच्य आवहालात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आल्यानंतर दातार लॅबवर कोरोना चाचण्या घेण्यास बंदी घातली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईनंतर दातार लॅबने जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांविरुध्द मानहाणीचा दावा करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

दातार लॅबची पाहीणी

त्यानंतर दातार कॅन्सर जेनेटिक कडून 1 मार्चला त्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना दातार कॅन्सर जेनेटिक्स तर्फे तांत्रिक अधिकाऱ्यांसह सदर लॅबची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी अशी विनंती केली होती.  त्यानुसार प्रयोगशाळेचे कामकाज तसेच कोरोना व्यवस्थापनातील सांख्यिकी संदर्भातील कामकाज याची तांत्रिक माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाकडून तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत 2 मार्चला लॅबची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या तांत्रिक समितीने त्यांचे अहवालात शिफारशी केल्या आहेत व त्यावर दातार कॅन्सर जेनेटिक्स ने प्रयोगशाळा सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

तांत्रिक समितीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्याकडे पाठवण्यात आला आहे व स्वाब स्वीकृती व तपासणीचे कामकाज सुरू करण्याबाबत त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे दातार जेनेटिकने हा प्रकार गैरसमजातून झाला असून कंपनी कुठलाही खटला करणार नसल्याने म्हटले आहे .