नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णींना कोरोनाची लागण

नाशिक : एकीकडे कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांची संख्या अधिक असताना  आता नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी यांची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत असतानाच महापौरांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे

महापौरांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता

सोमवार (ता. १६) त्यांना लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. कुलकर्णी यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यादरम्यान त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. .याबाबतची अधिकृत माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूराव नागरगोजे यांनी  दिली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

कुटुंबियांची देखील चाचणी

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आढळलेल्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांची संख्या अधिक राहिल्याने अॅक्‍टीव्ह रूग्ण संख्येत घट झाली आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात 2 हजार 515 बाधितांवर उपचार सुरू आहे. महापौर कुलकर्णी यांच्या संपर्कात कुणी आले असेल तर त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी तसेच त्यांच्या कुटुंबियांची देखील चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग