
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ह्या दीर्घ प्रतीक्षित मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पेन्शन संकल्प यात्रेचे आयोजन केले होते. यात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार दिल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली व तीव्र प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे दि. २५ ते २७ डिसेंबर दरम्यान बाइक रॅली, पायी दिंडी व मोर्चा अशा नियोजित आंदोलन कार्यक्रमात राज्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यात मालेगाव शहर व तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक नेते आर. डी. निकम, नीलेश ठाकूर, सचिन देशमुख, गोपाल पवार, जीवन बच्छाव व मालेगाव टीम, तर नाशिक येथून विजय बडे, सचिन सूर्यवंशी व सहकारी उपस्थित होते. यावेळी शासन अन्यायाविरुद्ध मोठ्या घोषणा देण्यात आल्या.
हेही वाचा:
- पुतिन विरोधक रशियन नेत्याचा ओडिशात संशयास्पद मृत्यू | Vladimir Putin Critic Dies
- जलऊर्जा प्रकल्पांना असलेल्या धोक्याची माहिती आगाऊ मिळण्यासाठी सामंजस्य करार
- प्रेक्षकांची अभिरूची बदलतेय-गोविंदा नाम मेरा
The post नाशिकचे शिक्षक कर्मचारी नागपूरच्या पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी appeared first on पुढारी.