
नाशिक (बोरगाव) : पुढारी वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यातील पवार कनिष्ठ महाविद्यालयातील गणित शिक्षक व राज्य महासंघाचे सहसचिव सुभाष सोनवणे आणि समाजशास्त्राचे शिक्षक अश्विन कस्तुरे यांना भोपाळ येथील कार्यक्रमात भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या छळ प्रतिबंधक विभागाच्या सहयोगाने सामाजिक, शैक्षणिक, कृषी, कला, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यात सुभाष सोनवणे व अश्विन कस्तुरे यांची निवड करण्यात आली होती. भोपाळला ११ डिसेंबरला हॉटेल आदित्य रेसिडेन्सीमध्ये प्रसिद्ध संगीतकार अरुण बक्षी, तिन्ही सेवा दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल तेजपालसिंह रावत, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह चौरसिया, अँटिकरप्शन प्रमुख प्रतिभा चौरसिया यांच्या हस्ते भारत भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. दोघांना सन्मानचिन्ह, चषक, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव अण्णासाहेब निपुंगे यांनी दोघांचे अभिनंदन केले.
हेही वाचा:
- ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ला पुरस्कार नाकारला, ‘भुरा’चे लेखक शरद बावीस्करांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
- Chinese companies: देशात १७४ नोंदणीकृत चिनी कंपन्या; ३ हजारांहून अधिक कंपन्यांमध्ये चिनी संचालक
- दिल्लीकरांना ४५० प्रकारच्या चाचण्या मोफत करता येणार : अरविंद केजरीवाल
The post नाशिकचे सोनवणे, कस्तुरे भारत भूषण पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.