नाशिकचे हॉटेल ‘गंगोत्री’ सील; तळीरामांनी घातल्या ‘ऑन द स्पॉट’ उठा-बशा!

सिडको (नाशिक) :  ‘गंगोत्री बार’वर दुसऱ्या दिवशी पोलिस व महापालिका प्रशासनाने कारवाई केली आणि बार बंद पाडला. यावेळी पेग रचत बसलेल्या तळीरामांची मात्र पाचावर धरण बसली. काहीही पर्याय नसल्याने त्यांनी ‘ऑन द स्पॉट’ उठा-बशा घालणे पसंत केले. काय घडले नेमके?

‘गंगोत्री बार’वर छापा अन् तळीरामांना शिक्षा

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे रस्त्यावर असलेल्या हॉटेल गंगोत्री बारवर रविवारी (ता. २८) परिमंडल दोनचे पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी अंबड गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, गुन्हे शोध शाखेचे पथक व पोलिस अंमलदारांनी महापालिकेच्या पथकासोबत छापा टाकला. हॉटेल गंगोत्री बारमधील १९ तळीरामांना ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारणी केली व गंगोत्री बार पुढील आदेशापर्यंत सील केले. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

तळीरामांना ‘ऑन द स्पॉट’ उठा-बशा

कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील छापा टाकलेल्या ‘गंगोत्री बार’वर दुसऱ्या दिवशी पोलिस व महापालिका प्रशासनाने कारवाई करून बार बंद पाडला व तळीरामांना ‘ऑन द स्पॉट’ उठा-बशा घालण्याची शिक्षा केली. या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न