नाशिकच्या इंडिपेंडस बँकेतून पैसे काढण्यास रिझर्व्ह बँकेचे निर्बंध! ६ महिन्यांपर्यंत बँकेतून पैसे काढणे बंद

नाशिक : आरबीआयने पुन्हा एकदा एका बँकेतून पैसे काढण्यास बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या मोठ्या निर्णयानंतर आता या बँकेचे ग्राहक ६ महिन्यांपर्यंत बँकेतून पैसे काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिकमधील इंडिपेन्डेन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेतील पैसे काढण्यावर बंदी घातली आहे.

६ महिन्यांपर्यंत बँकेतून पैसे काढू शकणार नाही
आरबीआयने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बँकेचे ठेवीदार ९९.८८ 'डिपोजिट इंश्योरेंस एंड क्रेडिट गारंटी कॉरपोरेशन' (डीआयसीजीसी) विमा योजनेत समाविष्ट आहेत. विमा योजनेअंतर्गत बँकेच्या प्रत्येक ठेवीदारास
डीआयसीसीकडून जमा केलेली विमा हक्क रक्कम ५ लाखांपर्यंतच्या ठेवीवर मिळण्याचा हक्क आहे. केंद्रीय बँकेने सांगितले की, "बँकेची सध्याची तरलता स्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खाते किंवा इतर कोणत्याही
खात्यातून ठेवींमधून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.” ग्राहक काही अटींच्या अधीन असलेल्या ठेवीच्या विरूद्ध कर्जाची सोडवणूक करू शकतात."

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

कोणतीही गुंतवणूक करणार नाहीत
बुधवारी व्यापार वेळ संपुष्टात आल्यानंतर आरबीआयने आणखी काही निर्बंध घातले आहेत. याअंतर्गत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणतेही कर्ज देणार नाहीत किंवा नूतनीकरण करणार नाहीत. या व्यतिरिक्त ते कोणतीही गुंतवणूक करणार नाहीत.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट